आरक्षण व सोडतीबाबत हरकत व सूचना स्विकारण्याबाबत आरक्षण अधिसूचना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषद व इतर कार्यालयाच्या सूचनाफलकांवर प्रसिध्द

 


           

अलिबाग,दि.14 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या दि.09 जून 2022 रोजीच्या आदेशान्वये नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

      त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीची कार्यवाही दि. 13 जून 2022 (सोमवार) रोजी पार पडली आहे.

      या आरक्षण व सोडतीबाबत हरकत व सूचना स्विकारण्याबाबत आरक्षण अधिसूचना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषद व इतर कार्यालयाच्या सूचनाफलक इ. वर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक