अलिबाग पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी 12 तास खुले ग्राहकांनी डाक विभागाच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

 


 

अलिबाग,दि.15 (जिमाका) : सर्वसामान्य जनतेसाठी अविरत सेवा देणारा डाक विभाग जनतेला जवळचा वाटत असल्याने पोस्ट ऑफिसमध्ये नेहमी गर्दी दिसते, पुष्कळ वेळा या गर्दीमुळे ग्राहक पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचे टाळतात. त्याच गोष्टींचा विचार करून ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी आता रायगड डाक विभागाने अलिबाग मुख्य डाकघर 12 तास ग्राहकांसाठी चालू ठेवण्यास सुरुवात केली आहे.

              याची सुरुवात वटपौर्णिमेपासून अलिबाग मुख्य डाकघर येथे झाली आहे. यातून ग्राहकांना आपली वेळ सांभाळून गर्दी नसताना डाक विभागाच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. बचत बँक आणि बहुउद्देशीय खिडकी रजिस्ट्रर, पार्सेल या सर्व सेवा बारा तास ग्राहकांसाठी सुरू राहणार आहेत.

              लोकाभिमुख सरकारी योजना राबविणारे पोस्ट ऑफिस नेहमी ग्राहकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असते त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई क्षेत्रातील ठाणे, पनवेल यासोबत ग्रामीण भागातील अलिबाग मुख्य डाकघर या ठिकाणी सुद्धा ही सेवा उपलब्ध झाली आहे.

             यामुळे नोकरदार ग्राहकांनाही आपल्या कार्यालयाच्या वेळा सांभाळून आता पोस्ट ऑफिसच्या योजनांचा लाभ सुलभ रितीने घेता येईल, असे मत  अलिबाग मुख्य डाकघरचे  पोस्टमास्टर श्री.गजेंद्र भूसाणे यांनी व्यक्त केले.

             सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड-अलिबाग  डाकघर विभागाचे अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी केले आहे.        

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक