सखी वन स्टॉप सेंटर चालविण्यासाठी इच्छुक पात्रताधारक स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे महिला व बालविकास विभागाचे आवाहन

अलिबाग, दि.10 (जिमाका):- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी, सखी वन स्टॉप सेंटर मंजूर करण्यात आलेले असून हे केंद्र सारंग विश्रामगृह, अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर येथे कार्यरत आहे. सखी वन स्टॉप सेंटर मार्फत संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन, कायदेशीर मदत, तात्पुरता निवारा इ. सेवा एकाच ठिकाणी पिडीत महिलांच्या आवश्यकतेनुसार पुरविल्या जातात.

अलिबाग सखी वन स्टॉप सेंटर येथील दैनंदिन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्रताधारक स्वयंसेवी संस्थेची निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शिकेनुसार महिलांच्या क्षेत्रात समुपदेशन, महिलांचे हक्क, सक्षमीकरण, महिलांवर होणाऱ्या हिंसाविरोधी काम करणाऱ्या जिल्हयातील इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे विहित नमून्यातील अर्ज दि.01 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत रायगड जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

इच्छुक मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नीलपुष्प बिल्डिंग, घर क्रमांक 738, नागडोंगरी चेंढरे, एम.आय.डी.सी कार्यालयासमोर येथे शासकीय सुट्टी वगळता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

केंद्रशासन / राज्य शासनाकडून योजनेबाबत वेळोवेळी पारित होणारे शासन निर्णय, अधिसूचना, नियम, अटी व शर्ती स्वयंसेवी संस्थांना बंधनकारक असतील. तसेच कोणतेही कारण न देता, कोणताही अथवा सर्व अर्ज अपात्र ठरविण्याचा अथवा संपूर्ण प्रकिया रद्द करण्याचा अधिकार अध्यक्ष, सखी वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना आहेत.

इच्छुक संस्थांनी या प्रक्रियेबाबतच्या अधिक माहितीसाठी संरक्षण अधिकारी श्रीमती आरती साळुंके (मो.नं. 9403479788) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सदस्य सचिव, व्यवस्थापन समिती वन स्टॉप सेंटर तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक