ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे टपाल विभागाचे आवाहन

 


अलिबाग, दि.11 (जिमाका):- इच्छुक आणि पात्र उमेदवारासाठी रायगड डाक विभाग अधीक्षक डाकघराकडून ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) 111 जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराला 02 मे 2022 ते 05 जून 2022  या कालावधीत http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.

उमेदवारासाठी असलेल्या अन्य अटी पुढीलप्रमाणे आहेत :-   माध्यमिक शाळा म्हणजे इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, जीडीएस  श्रेणींसाठी इच्छुक  उमेदवारांना केंद्र सरकार/राज्य सरकार/विद्यापीठे/मंडळ/खाजगी  संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक प्रशिक्षण संस्थेकडून किमान 60 दिवसांच्या मूलभूत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये उमेदवाराने दहावी किंवा बारावी किंवा इतर कोणत्याही उच्च शैक्षणिक स्तरावर संगणक हा विषय म्हणून अभ्यासला  असेल, अशा प्रकरणांमध्ये मूलभूत संगणक ज्ञान प्रमाणपत्राची ही आवश्यकता शिथिल असेल अशा प्रकरणांमध्ये वेगळे प्रमाणपत्र जोडण्याची गरज नाही. उमेदवार किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेतून शिकलेला असावा. महाराष्ट्र राज्याची स्थानिक भाषा म्हणून मराठी ग्राह्य धरली जाते.

ऑनलाईन अधिसूचना जारी केल्याची तारीख म्हणजेच 02 मे 2022 नुसार, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 18  ते 43 वर्षे, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी,अनुसूचित जाती/जमाती/ इतर मागासवर्ग प्रवर्गाअंतर्गत समाविष्ट नसलेले उमेदवार आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न  रु. 8.00 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा या अनुषंगाने, त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी विहित स्वरूपात उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.  वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

निवडलेल्या उमेदवाराने निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या आत आणि रुजू होण्यापूर्वी टपाल कार्यालयाच्या  टपाल ग्राम /वितरण अधिकार क्षेत्रात वास्तव्याला राहिले पाहिजे. या पदासाठी अर्ज करण्याच्या उद्देशाने किंवा त्या पदावर निवडीच्या  उद्देशाने, ही अट उमेदवारासाठी पूर्व-आवश्यक नाही आणि निवड झालेल्या उमेदवाराने निर्धारित वेळेत विहित अटींचे पालन करणे मात्र आवश्यक आहे. अधिक तपशिलांसाठी आणि ऑनलाईन अर्जाच्या नमुन्यासाठी उमेदवाराला http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक