चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत

 



 

अलिबाग, दि.11 (जिमाका):- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83  व 88 अन्वये चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल)  तयार करण्यासाठी सहकार  खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्षे पूर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त) चार्टर्ड अकाउटंट यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 अर्जाचे नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण, जिल्हा उपनिबंधक/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दि. 11 मे 2022 ते दि. 10 जून 2022 या कालावधीत कार्यालयीने वेळेत मिळू शकतील.  या अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक अर्हतेसंबंधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र) वकील असल्यास बार कौन्सिल सर्टिफिकेट जोडावे, अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. याबाबतची जाहिरात सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ.सोपान शिंदे यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक