संजय गांधी निराधार योजना कमिटीची सभा संपन्न; सभेत सर्व योजनांचे 28 अर्ज मंजूर


अलिबाग, दि.11 (जिमाका):- अलिबाग तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीची सभा दि.09 मे 2022 रोजी संजय गांधी योजना कमिटी अलिबागचे अध्यक्ष श्री.प्रकाश बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग तहसिलदार कार्यालय येथे संपन्न झाली. या सभेस श्री.हेमनाथ खरसांबळ, श्री.उत्तम पाटील, श्री.सुनिल पाटील, श्रीमती दक्षता राऊत, श्रीमती निलिमा भगत हे अशासकिय सदस्य तसेच श्री.हरिश्चंद्र कुंडल व श्रीमती रुबिना भगत हे शासकिय सदस्य उपस्थित होते.

यावेळी संजय गांधी योजना नायब तहसिलदार श्रीमती मानसी पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, इत्यादी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या सभेत सर्व योजनांचे 28 अर्ज मंजूर करण्यात आले.

अलिबाग तालुक्यात मार्च 2022 अखेर संजय गांधी योजनेंतर्गत 1 हजार 163, श्रावणबाळ योजनेंतर्गत 801, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेंतर्गत 336 असे एकूण 2 हजार 300 लाभार्थी लाभ घेत असून या लाभार्थ्यांना वर्षभरात एकूण रु.02 कोटी 62 लाख 72 हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक