Posts

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजना प्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

  रायगड(जिमाका), दि.15:-   राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात ,  कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया व मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करावयाची आहे. या योजनेंतर्गत  GeM पोर्टलवर दि. 14 जुलै, 2025 रोजी  निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेंतर्गत दि. ...

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

    रायगड(जिमाका), दि.15:-  सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे.   https://mahadbtmahait.gov.in/ Home/Index  या लिंकच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे दि.30 जुलै 2025 पासून सुरु होणार असून शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी केले आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे अनु.जाती, व विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थाना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्...

जिल्हा न्यायालय रायगड व तालुका न्यायालय येथे विशेष मध्यस्थी मोहिमेचे आयोजन

  रायगड (जिमाका) दि.14 :- मध्यस्थी म्हणजेच संवादाच्या आणि समन्वयाच्या माध्यमातून वाद मिटविण्याची एक शांततामय व कायदेशीर पध्दत आहे. 'राष्ट्रासाठी मध्यस्थी याचा अर्थ असा होतो की, मध्यस्थी ही प्रकिया राष्ट्रहितासाठी वापरली जात आहे.  केवळ वैयक्तिक किंवा संस्थात्मक पातळीवर नव्हे, तर संपूर्ण देशाच्या हितासाठी ही मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेचा जास्तीत जास्त पक्षकारांना फायदा मिळावा या अनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मध्यस्थी मोहिम जिल्हा न्यायालय रायगड तसेच तालुका न्यायालय येथे दि.01 जुलै  ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबागच्या वतीने या मोहिमेअंतर्गत न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार अपघात, नुकसान भरपाई, चेक बाऊन्सची प्रकरणे, वाटपाचे दावे, वाणिज्यिक दावे व इतर सर्व तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे विशेष मध्यस्थी मोहिमेअंतर्गत त...

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- खा. श्रीरंग बारणे दिशा’ समितीची बैठक संपन्न

Image
    रायगड जिमाका दि. 14 -- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.यामध्ये कोणताही हजगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे व सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक  नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे तर सह अध्यक्षस्थानी खा. सुनील तटकरे हे होते. बैठकीला खा. धैर्यशील पाटील, आ महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे,  मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या प्रकरणी दोषी अस...

नवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

  प   रायगड(जिमाका)   दि.11:-   जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,  रायगड - अलिबाग  व  पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सयांच्या संयुक्त विद्यमाने दि . 1 5  जुलै , 2025   रोजी सकाळी  10.00  ते दुपारी 0 2.00  या वेळेत आपल्या डॉ.के.एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट न. 10, सेक्टर 16 न्यू पनवेल  इस्ट ता.पनवेल  येथे   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा   व   मुख्यमंत्री   युवाकार्य   प्रशिक्षण   योजना (Internship) उमेदवार   निवड   मेळावा  आ योजित   करण्यात आला असून जिल्ह्यातील  जास्तीत   जास्त   बेरोजगार   उमेदवारांनी   या   रोजगार   मेळाव्याचा  लाभ  घ्यावा ,  असे   आवाहन   जिल्हा   कौशल्य   विकास,   रोजगार व उद्योजकता   मागदर्शन   केंद्र ा च्या   सहायक   आयुक्त   श्रीम.अ.मु.पवार   यांनी   केले   आहे. जिल्ह्यातील   नामांकीत ...

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

    रायगड(जिमाका)दि.11:-   पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरिता 04 दिवस लागणार असल्याने दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 रोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड व तहसिलदार पोलादपूर यांनी केलेल्या विनंतीनुसार  दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 या कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबबात जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. त्यानुसार नागरिकांनी सदर कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून  पोलादपूर-माणगाव ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा व पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-को ल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. ०००००००००

विकसित महाराष्ट्र 2047 साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

    रायगड (जिमाका)दि.10:- विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध 16 क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत -भारत @ 2047 करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2029 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी   https://wa.link/o93s9m  यावर आपले मत नोंदवावे.