जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत
रायगड(जिमाका), दि.15:- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे. https://mahadbtmahait.gov.in/
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे अनु.जाती, व विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थाना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात.
योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड अलिबाग, कच्छि भवन, नेमीनाथ मंदिराजवळ, सेंटमेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधवा
000000
Comments
Post a Comment