राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजना प्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

 

रायगड(जिमाका), दि.15:- राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया व मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करावयाची आहे. या योजनेंतर्गत GeMपोर्टलवर दि. 14 जुलै, 2025 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेंतर्गत दि. 18 जुलै, 2025 रोजी निविदापूर्व सभा राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. 25 जुलै, 2025 रोजी दु.12.00 वाजेपर्यंत आहे.

 GeM पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या देशनिहाय निविदांचे क्रमांक पुढीलप्रमाणे :- दौरा-1 युरोप, दौऱ्याचे एकूण दिवस 12 दिवसनिविदा क्रमांक- GEM/2025/B/6443685. दौरा-2 इस्राईल, दौऱ्याचे एकूण दिवस 09 दिवसनिविदा क्रमांक- GEM/2025/B/6443752. दौरा-3 जपान, दौऱ्याचे एकूण दिवस 10 दिवसनिविदा क्रमांक- GEM/2025/B/6443819. दौरा मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स, दौऱ्याचे एकूण दिवस 12 दिवसनिविदा क्रमांक GEM/2025/B/6443399. दौरा 5 चीन, दौऱ्याचे एकूण दिवस 08 दिवसनिविदा क्रमांक GEM/2025/B/6443459. दौरा 6 दक्षिण कोरिया, दौऱ्याचे एकूण दिवस 10 दिवसनिविदा क्रमांक GEM/2025/B/6443596.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज