पालकमंत्र्यांच्या हस्ते विहिरीच्या पाण्याचे जलपुजन

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 15 ऑगस्ट, 2016                                                      वृत्त क्र.532

पालकमंत्र्यांच्या हस्ते विहिरीच्या पाण्याचे जलपुजन


अलिबाग दि.15 :- अलिबाग तालुक्यातील चरी ग्रामपंचायत हददीतील कोपरगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत  विलास ठाकूर यांच्या शेतात बांधण्यात आलेल्या विहिरीच्या पाण्याचे जलपुजन आज गृहनिर्माण तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते करण्यात आले.
            यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती श्रीमती चित्रा पाटील,  सरपंच विजय ठाकूर, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच ग्रामपंचायत हददीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
            याप्रसंगी या योजनेचे लाभार्थी विलास ठाकूर यांनी मंत्रीमहोदय व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.
00000
   


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक