जिल्हा सायबर लॅबचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 15 ऑगस्ट, 2016                                                      वृत्त क्र.531

जिल्हा सायबर लॅबचे
पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन







            अलिबाग दि.15 :- रायगड जिल्हयातील सायबर लॅबचे उदघाटन गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांचे हस्ते पोलीस मुख्यालय अलिबाग येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट वापराच्या माध्यमातून ई-बँकिंग, पेपरलेस ऑफिस, सोशल मिडीया या संकल्पना उदयास आल्या असून इंटरनेटच्या माध्यमातून व इतर अद्यावत तंत्रज्ञानावर आधारीत घडणाऱ्या गुन्ह्यांची तसेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत असून या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस मुख्यालयात सायबर लॅब सुरु करण्याचा निर्णय शासनाच्या गृह विभागामार्फत घेण्यात आला. यानुसार आज रायगड जिल्हयातील सायबर लॅबचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  
सायबर लॅबच्या कामकाजाची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेझ हक व सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी मंत्रीमहोदयांना दिली.      
सायबर गुन्हेगारीवर वचक बसण्याबरोबरच गुन्ह्यांची उकल तात्काळ करणे व आरोपींचा तात्काळ शोध लावण्यास सायबर लॅबचा उपयोग होणार आहे.  त्याद्वारे क्लिष्ट अशा सायबर गुन्ह्यांचा तपास, मोबाईल फ्रॉड, इंटरनेट फ्रॉड, सायबर दहशतवाद,फिशिंग (खोटी लॉटरी लागणे किंवा बँकेमार्फत ग्राहकांना कॉल केले असे भासवून फसवणूक करणे) यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे शक्य होणार आहे.  तसेच अनेक विविध सोशल साईड  विदेशात असल्याने सायबर गुन्हयानंतर त्यांच्याशी पत्रव्यवहार व गुन्हयांची उखल करण्यासाठी याचा उपयोग होईल.  जिल्हयातील सायबर लॅब मुख्य सायबर लॅबशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत.   रायगड जिल्हयात सायबर लॅब करीता अत्याधुनिक सॉफ्टवेअर पुरविण्यात आले असून, प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्हयातील सायबर लॅब जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वीत होत आहे.
समाधान व नियंत्रण कक्ष
अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयातील समाधान कक्ष तसेच नियंत्रण कक्षाचे उदघाटनही पालकमंत्री यांचे हस्ते  करण्यात आले.  समाधान कक्षात पासपोर्ट संदर्भातील दाखले तसेच पोलीस मुख्यालयात विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना एकाच ठिकाणी माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.  नियंत्रण कक्षामार्फत जिल्हयातील वाहतुकीची तसेच आपत्कालीन संदर्भातील घटनांचे नियंत्रण करुन आवश्यक ती सेवा पुरविण्यासाठी उपयोग होणार आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक