ऑनलाईन शिष्यवृत्ती संदर्भात आज सामाजिक न्याय विभागाची प्राचार्यांसाठी कार्यशाळा

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 23 ऑगस्ट 2016                                                             वृत्त क्र.547
ऑनलाईन शिष्यवृत्ती संदर्भात आज
सामाजिक न्याय विभागाची प्राचार्यांसाठी कार्यशाळा

अलिबाग दि.23 :- सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती बाबत अडीअडचणी दूर करण्यासाठी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वा. अलिबाग येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर भारत सरकारची शिष्यवृत्ती देण्यात येते.  सन 2015-16 मध्ये  जिल्ह्यातील 210 महाविद्यालये एका विद्यापीठा मधील 27,705 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली आहे.   तसेच विविध कॉलेज,महाविद्यालय स्तरावर 1775 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत.  तर सन 2014-15 मध्ये 1921 विद्यार्थ्याचे अर्ज प्रलंबित आहेत.          सन 2015-16 मधील विविध कॉलेज स्तरावर प्रलंबित असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करता यावी यासाठी कॉलेज स्तरावरील अडीअडचणी समजून घेणे, सन 2016-17 मध्ये ऑनलाईन प्रणालीचे वेळापत्रक नियोजनासाठी सर्व कॉलेजच्या प्राचार्यांची कार्यशाळा 24 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.30 वा. कॉन्फरन्स हॉल,पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, वेश्वी  पी.एन.पी.बस स्टॉप समोर अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे. 
तरी जिल्ह्यातील सर्व कॉलेजच्या  प्राचार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक