स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 15 ऑगस्ट, 2016                                                      वृत्त क्र.530
   
स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा
    पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
अलिबाग, दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 69 वा वर्धापन दिन रायगड जिल्हयात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.  गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे  पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी  रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती श्रीमती चित्रा पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरिक्षक परेड कमांडर सुनिल जायभाय यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस दलाच्या पथकांनी पालकमंत्री महोदयांना मानवंदना दिली.    
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री.महेता यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले महाड येथील दुर्घटना अत्यंत दुर्देवी होती.  या घटनेबद्दल राज्यातच नव्हे तर देशभरात शोक व्यक्त केला. त्यानंतर मंत्रीमहोदयांनी व उपस्थितांनी  महाड येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कार प्राप्त अधिकारी व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.  तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.  गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक-2016 व राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले असे नारायण वारे (उपनिरिक्षक माणगांव पोलीस ठाणे), गुरुनाथ माळी (पोलीस हवालदार-दहशतवाद विरोधी पथक), राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एन.टी.एस. सन-14-15) इयत्ता दहावीसाठी राष्ट्रीयस्तर परीक्षेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी कु. वैशाली बौध्द आर.सी.एफ.सेकंडरी हायस्कूल कुरुळ-अलिबाग, कु. मिहिर चवरकर- सेंट जोसेफ स्कूल, नवीन पनवेल.
 माझी कन्या भाग्यश्री योजनेतंर्गत लाभार्थी- श्रीमती सुहानी पाटील, आशा गावंड, स्नेहा खांदेकर, क्रांती भिवंडे, आशिका मणियार यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
  या समारंभासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी, जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील,उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) राजेंद्र दंडाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.बी.तरकसे,चिटणिस श्री.देशमुख, जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी  तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.
                                                           000 000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक