आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक :- 19 ऑक्टोबर  2016                                                        वृत्त क्र. 676

आदर्श आचार संहितेचे
काटेकोरपणे पालन करावे
                                                      ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग, (जिमाका)  दि.19 :- राज्यात  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहिर झाली असून त्यानिमित्त आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. जिल्हयातील 9 नगरपरिषदांच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे असलेल्या  आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी व पालन  काटेकोरपणे करावे असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2016 च्या संदर्भात आज  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.  या बैठकीस  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे,  अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तसेच सर्व संबंधित  अधिकारी उपस्थित होते
पुढे बोलताना जिल्हाधिकारी  म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्था 2016 ची आदर्श आचार संहिता दिनांक 18 ऑक्टोबर 2016 पासून सुरु झालेली आहे. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी  निवडणूकी संदर्भात आलेल्या सर्व आदेशाचे व सूचनांचे सविस्तर वाचन करावे, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची निर्मिती, कर्मचारी नियुक्ती करावी. त्यांच्या जबाबदारीचे व कामकाजाचे वाटप करावे. निवडणूक प्रक्रिया ही गणितासारखी असते, ती नियमा नुसारच व्हावी लागते.  निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित मतदार संघातील परिस्थितीनुसार कायद्यास अनुसरुन योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच पोलीस व इतर संबंधित विभागाशी समन्वय राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची खबरदारी घ्यावी. अशा ही सूचना त्यांनी दिल्या.
            मतदान वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत जागृत रहावे, यासाठी सर्व सहाय्यक माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करावा. त्याचप्रमाणे पात्र मतदारांनी निर्भयतेने मतदान करुन, आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. असे आवाहन त्यांनी केले. 
या बैठकीला निवडणूक अधिकारी तथा प्रांत सर्वश्री दत्ता भडकवाड, सर्जेराव सोनावणे,  श्रीमती सुषमा सातपुते, रविंद्र बोंबले, प्रविण पवार, उपजिल्हाधिकारी श्रीमती अपूर्वा वानखेडे, उपजिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे संबंधित नगर परिषदांचे मुख्याध्याकारी, कार्यकारी अभियंता, अलिबाग विलास पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक