कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

दिनांक :- 10 नोव्हेंबर  2016                                                                                         वृत्त क्र. 715
कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

अलिबाग,दि.10 (जिमाका) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या सन 2016 या वित्तिय वर्षातील नियोजित कार्यक्रमांतर्गत प्रमुख जिल्हा न्यायाधिश,तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय विधी सेवा दिवस(National Legal Services Day) या दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 9 नोव्हेंबर2016 रोजी दिवाणी न्यायालय व. स्तर अलिबाग यांचे न्यायकक्षामध्ये करण्यात आले होते.
            या कार्यक्रमाचेवेळी मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग, के.आर.पेठकर, जिल्हा न्यायाधीश-1, रायगड अलिबाग., दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अलिबाग तथा सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग, एल.डि.हुली आणि अन्य न्यायिक अधिकारी वर्ग, प्रसाद एस.पाटील, जिल्हा सरकारी वकिल आणि प्रविण एम.ठाकूर, अध्यक्ष वकिल संघटना अलिबाग, व अन्य वकिल वर्ग उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा न्यायाधिश, रायगड अलिबाग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रोते वर्गाला लोकन्यायालय आणि मध्यस्थी प्रक्रीया याबाबत माहिती सांगितली.
वक्ते म्हणून श्री.विजय पाटील यांनी विधी सेवा दिनाचे महत्व आणि विधी सेवा प्राधिकरणाकडील योजनांची माहिती दिली. तर श्री. श्रीराम ठोसर,यांनी मध्यस्थी प्रक्रीया या विषयावर माहिती दिली.
मान्यवर उपस्थितांचे स्वागत करुन श्री.एल.डी.हुली,दिवाणी न्यायाधीश, व.स्तर अलिबाग यांनी प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.पल्लवी तुळपुळे यांनी केले .प्रसाद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक