सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ

दिनांक:- 20/12/2016                                                                                                               वृत्त क्र. 816
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन
कार्यक्रमाचा शुभारंभ


अलिबाग, दि.20 :- रायगड जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन-2016 कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा वन अधिकारी श्रीमती जयंती बॅनर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत  जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर (निवृत्त ) सोपान डोके, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक एच.एन. बडे, ॲड. प्रविण ठाकूर चिटणीस श्री.देशमुख  तसेच विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अनेक  सैनिक आपले बलिदान देतात.  अशा सैनिक /माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. देशाच्या सिमेचे रक्षण आपले सैनिक करत असतात.    म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पुर्ण करावे, असे आवाहन जिल्हा वन अधिकारी श्रीमती जयंती बॅनर्जी यांनी आज येथे केले.  याप्रसंगी रायगड जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा वन अधिकारी श्रीमती जयंती बॅनर्जी यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा इष्टांक पुर्ण करुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 
ध्वजदिन निधी संकलनातून माजी सैनिक, सैनिकांच्या पाल्यांसाठी शिक्षणाच्या परिपूर्तीसाठी, शिष्यवृत्ती, वसतिगृहासाठी निधी, सैनिक, माजी सैनिक, त्यांचे पाल्य यांच्या कल्याणासाठी या निधीतून विविध योजना राबविण्यात येतात.  तसेच माजी सैनिकांच्या पुर्नवसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत काम केले जाते.  रायगड जिल्ह्याचा इष्टांक रुपये 54 लाख 45 हजार रुपयांचा इतका होता.   यातील 84 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर (निवृत्त ) सोपान डोके यांनी प्रास्ताविकात सांगितले.
 याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस अधिक्षक कार्यालय, परिवहन कार्यालय पेण,  तहसिल कार्यालय, अलिबाग, पेण,सुधागड, पनवेल, रोहा इ.कार्यालयांचा  तसेच 1 लाख रुपये  व्यक्तीगत ध्वजदिन निधीसाठी देणगी देणाऱ्या ऍ़ड.प्रविण ठाकूर यांचा व इतर व्यक्तीगत देणगी देणाऱ्या श्रीमती जोशी, शोभा फाटक  यांचा जिल्हा वन अधिकारी श्रीमती जयंती बॅनर्जी व  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर (निवृत्त ) सोपान डोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक