रस्ता सुरक्षा पंधरवडा आपल्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

रस्ता सुरक्षा पंधरवडा
आपल्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी
 वाहतूक नियमांचे पालन आवश्यक
                                          ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग दि.9 (जिमाका)  ) जिल्ह्यात दि.  9 ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा व अभियान  राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील वाहन चालकांनी वाहतुकींच्या नियमांचे पालन करुन आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा जपावी असे आवाहन, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात या पंधरवड्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.  त्यावेळी त्या बोलत होत्या.
             या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, प प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, परिवहन व पोलीस  विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. 
            रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्त सर्वांना सुरक्षेबाबत शुभेच्छा देत जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, वाहतूकींच्या नियमांचे पालन जर सर्वांनी केले तर निश्चितच सुरक्षेच्यादृष्टीने ते महत्वाचे ठरेल. वाहन चालवताना रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेची तसेच आपल्या स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. यात रस्ता सुरक्षा पंधरवडयात  रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त होणाऱ्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे.  तसेच  रस्ता सुरक्षा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन   त्यांनी केले आहे.
            जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी रस्ता सुरक्षेच्या संदर्भातील माहिती पुस्तक व पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.  तसेच यामाहा कंपनीद्वारे पुरस्कृत केलेल्या फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमातून रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  सदरील व्हॅन संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असून त्याद्वारे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.  
प प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने यांनी यावेळी उपरोक्त फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमातून शालेय  व महाविद्यालयींन विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती करण्यात येणार आहे.  वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे, हॅमेल्ट न घालणे  यावर वाहतूक पोलीस व परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.  तसेच  रस्त्यावर वाहन चालवताना वाहन सुरक्षित चालवावे, वाहनापासून प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे सांगितले.
दि. 10 जानेवारी चे उपक्रम
रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्त आज दिनांक 10 जानेवारी रोजी होणार उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
1) महाड येथे धोकादायक व रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकांचे प्रशिक्षण व उजळणी शिबीर.
2) खालापूर टोलनाका येथे खाजगी विशेष तपासणी विशेष लक्ष, आपत्कालीन दरवाजा,आसन व्यवस्था व
      शयनिका.
3) पाली-सुधागड  येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित
     योगदानाबाबत विवेचन.
4)  महाड गाव येथे यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा
     अनिवार्यता प्रबोधन.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक