रायगड जिल्हयाची 101 टक्के महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

रायगड जिल्हयाची 101 टक्के
महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती
                                                     -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग दि.31 (जिमाका), रायगड जिल्हयासाठी शासनाने दिलेल्या महसूल वसूली उद्दिष्टांची 101.88 टक्के अशी विक्रमी वसूली करण्यात आली. या वसूली बद्दल जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
सन 2016-17 या वर्षासाठी रायगड जिल्हयाला अ पत्रकासाठी 86 कोटी, गौण खनिजासाठी 115 कोटी व करमणूक करासाठी 12.50 कोटी असे एकूण 213.47 कोटी एवढे वसूलीचे उद्दिष्ट शासनामार्फत देण्यात आले होते. 31 मार्च, 2017 अखेर या उद्दिष्टांपैकी अ पत्रक 95.58 कोटी, गौण खनिज 105.57 कोटी, करमणूक 15.71 कोटी असे एकूण 217.48 कोटी एवढी वसूली साध्य केलेली आहे. दिलेल्या वसूली उद्दिष्टांच्या 101.88 टक्के एवढी वसूली जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे.
सन 2016-17 या आर्थिक वर्षात रायगड जिल्हयातील  विविध रेती गटाचे लिलाव झालेले नव्हते. त्यामुळे गौण खनिज वसूली पूर्ण करणे हे अवघड उद्दिष्ट होते. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये अनधिकृत रेती खाणींवर धडक कारवाई केली. अनधिकृत रेतीची वाहतूक ज्या मार्गावरुन होते असे 11 तपासणी नाके निर्माण केले व त्या ठिकाणी तलाठी, पोलीस /होमगार्ड यांचे संयुक्त पथक स्थापन केले. अनधिकृत रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर खाण व खनिज (विकास व विनियम) अधिनियम 1957 च्या कलम 21 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्हयातील सर्व तहसिलदार उप‍ विभागीय अधिकारी यांनी अनधिकृत गौण खनिजांवर धडक कारवाई केल्यामुळे गौण खनिजाचे 92 टक्के उद्दिष्ट साध्य करता आले.
तहसिलदार निहाय वसूलीमध्ये पेण तहसिलदारांना दिलेल्या उद्दिष्टापैकी 142 टक्के वसूल केलेले आहे. तसेच पनवेल तहसिलदारांना दिलेल्या उद्दिष्टांपैकी 127 टक्के उद्दिष्ट वूसल केलेले आहे. तर उप विभागामध्ये पनवेल उपविभागाने दिलेल्या उद्दिष्टांपैकी 106.47 टक्के वसूलीचे उद्दिष्ट साध्य केलेले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक