राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला
 राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक

अलिबाग दि.31, (जिमाका)  राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास सन 2016 या वर्षाकरीता राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनात गतवर्षी राबविण्यात आलेल्या  प्रशासकीय उपक्रमाची शासनाने दखल घेवून हे पारितोषिक जाहिर केले आहे. या पारितोषिक मिळाल्या बद्दल गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले आहे.
 जिल्हा व राज्य स्तरावर 2002 पासून प्रतिवर्षी या अभियान अंतर्गत स्पर्धा घेतली जाते.  त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आपला सहभाग नोंदविला होता. सन -2016 मध्ये रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत प्रशासकीय सुधारणेबाबत पुढील बाबींकडे विशेष लक्ष पुरविलेले गेले.  1) कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता 2) कार्यपध्दतीचे सुलभीकरण 3) ई-गर्व्हनस 4) अनुत्पादक खर्चात काटकसर 5) महसूल उत्पन्न वाढविणे 6) नियमांचे/ अधिनियमांचे एकत्रिकरण करणे व अनावश्यक कायदयांचे निरसन करणे 7) प्रशासन लोकाभिमुख करणे 8) कर्मचारी / अधिकारी यांच्या आस्थापना विषयक बाबी अदयावत करणे. राबविण्यात आलेल्या  सदरील उपक्रमाचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, यांनी मुख्य सचिव यांचे कार्यालयात केले होते. या उपक्रमाची दखल घेवून रु.4 लाख रुपयांचे राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाले आहे. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या मार्गदर्शनात संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
या अभियानात रु. 10 लाख रोख रक्कमेचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांना मिळाला असून रु. 6लाख रोख रक्कमेचा द्वितीय पुरस्कार रत्नागिरी पोलीस अधिक्षक कार्यालयास मिळाला आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड