भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन 28 स्थळांचा विकास करणार -- सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने
  पावन 28 स्थळांचा विकास करणार
                                               -- सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

        अलिबाग दि. 12:- (जिमाका)   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन        झालेल्या   ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टया महत्वाची असलेल्या 28 स्थळांचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासाठी चालू वर्षासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज महाड येथे दिली.
           महाडमधील ऐतिहासिक चवदार तळयाचे सुशोभिकरण व  शाहू महाराज सभागृह नुतनीकरणसाठी प्रत्येकी 1 कोटी निधी दिला आहे. त्या संदर्भात संबंधित विभागाचेे अधिकारी व महाड नगरपरिषदेची संयुक्त बैठक मंत्रीमहोदयांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आली होती.   
यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा कु. स्नेहल जगताप, उपनगराध्यक्ष श्री. कविस्कर,  तहसिलदार  औदुंबर पाटील,प्रसाद खैरनार, सहाय्यक आयुक्त  समाजकल्याण विभाग आदी मान्यवर उपस्थित होते.
          मंत्रीमहोदय मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आधुनिक भारताचा पाया रचून सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात ऐतिहासिक योगदान देणारे भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासनाने सदर निर्णय घेतला आहे. सामाजिक समतेच्या लढयाची सुरुवात केलेल्या महाडच्या चवदार तळयाचा परिसर, क्रांतीस्तभ व सभागृहाचे नुतनीकरण तसेच आंबवडे या बाबासाहेबांच्या गावातील स्मारकाचा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच माता रमाई यांचे जन्मस्थान असलेले वणंद गाव, शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप साकारणारे रायगड जिल्हयातील चरी गाव, पुणे जिल्हयातील तळेगांव दाभाडे येथील बाबासाहेबांचा बंगला, तसेच जिल्हयातील स्मारके, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगांव येथील स्मारक, बाबासाहेबांची बैलगाडीतून मिरवणूक काढलेले तदवले गांव, चंद्रपूर येथील दिक्षा दिलेले स्थळ, गोंदीया जिल्हयातील देसाईगंज येथील दिक्षा भूमी, बुलढाणा जिल्हयातील पातुर्डा येथील बुध्दविहार, संत चोखामेळा यांचे जन्मस्थान असलेले मेव्हणा राजा, लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी ,सातारा जिल्हयातील नायगांव या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव, सातारा येथील ज्या शाळेत बाबासाहेबांनी प्रथम प्रवेश केला ती शाळा, ऐतिहासिक वाचनालय, रत्नागिरी जिल्हयातील काडाई कोंड,औरंगाबाद येथील मिलींद कॉलेजमध्ये मध्यवर्ती अभ्यासिका आणि वाचनाल, देहूरोड येथील ऐतिहासिक बौधविहार, ठाणे जिल्हयातील किनवली येथे स्मारक उद्यान,सांस्कृतिक भवन आदी ऐतिहासिक पार्श्वभुमी असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे सदर कामांना गती मिळेल असे ना.बडोले म्हणाले.
             महाडमधील चवदार तळे, माता रमाई विहार,छत्रपती शाहू महाराज सभागृह,क्रांतीस्तंभ या ऐतिहासिक परिसराची मंत्रीमहोदयांनी यावेळी पाहणी केली. यावेळी मंत्रीमहोदयांच्या समवेत  

                                                       000000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक