डीजीधन मेळाव्यात नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे - प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

डीजीधन मेळाव्यात नागरीकांनी
मोठया प्रमाणात सहभागी व्हावे
                                                   - प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

            अलिबाग दि.12 (जिमाका), निती आयोगाने ठरवून दिलेल्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 14 एप्रिल, 2017 रोजी प्रत्येक तालुका ठिकाणी Digital Financial Drive  चे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यात नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी केले आहे.
            मोहिम उद्दिष्ट
मा.पंतप्रधान, भारत सरकार यांच्या उपस्थितीत 14 एप्रिल, 2017 रोजी नागपूर येथील 100 वा डीजी धन  मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डीजी धन मेळाव्याच्या माध्यमातून सर्व नागरीकांपर्यंत बँक खाते आधार क्रमांक, मोबाईल क्रमाकांशी जोडणे, आर्थिक व्यवहार करताना ते युपीआय, युएसएसडी, क्रेडीट, डेबीट कार्ड, एईपीएस, वॉलेट अशा डीजीटल माध्यमांतील पर्यायांमधून करणे इ. माहिती पोहच करणे हा मुख्य हेतू आहे. तसेच उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांना सामाजिक व आर्थिकदृष्टया सक्षम करुन त्यांना डीजीटल व्यवहार व तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरीता प्रोत्साहित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
14 एप्रिल, ते 14 ऑगस्ट, 2017 या कालावधीत लोकप्रतिनिधींच्या सहभाग व सहकार्याने जिल्हयात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर 14 एप्रिल, 2017 रोजी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने आधार नोंदणी उपक्रम असून ज्यांचे अद्यापही आधार कार्ड  नाहीत त्यांची आधार नोंदणी केली जाईल. यात तीन गट करण्यात आले आहेत. 1.) सहा वर्षापेक्षा लहान. 2.) सहा ते अठरा वर्ष वयोगट 3.) अठरा वर्षावरील व्यक्तींची आधार नोंदणी करण्यात येईल. या सर्वांची आधार सहित बँक खाती उघडण्यात येतील.
तसेच  स्थानिक व्यापाऱ्यांना रोकड रहित व्यवहार पध्दत अवलंब करण्याकरीता क्रेडीट/डेबिटकार्ड अशा डिजिटल माध्यमांतील पर्यायाची माहिती उपलब्ध करणे इ. कार्यक्रमाचा समावेश आहे. जिल्हयातील विविध महाविद्यालयातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धा, तसेच राज्य घटनेवर आधारीत स्पर्धा असे उपक्रम होतील. महत्वाचे म्हणजे जिल्हयातील बँकांना गावागावातील वेगवेगळया स्थानिक व्यापाऱ्यांकडे पॉस मशिनचे वितरण करण्यात येवून त्याद्वारे नागरीकांकडून डिजिटल व्यवहार करुन घेण्यात येणार आहेत.  या खेरीज ग्रामपंचायत स्तरावर रोकडरहित व्यवहार यांना प्रोत्साहान देण्याकरीता आधार क्रमांक आधारीत Adhar Enable Payment System तयार करणे व रोकड रहित व्यवहाराचे जनजागृतीसाठी स्वयंसेवक निर्माण करणे, मा.पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे ग्रामपंचायत स्तरावर थेट प्रक्षेपण  असे उपक्रम देखील आहेत.
तरी सदर मेळाव्यात नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक