भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व डिजी धन मेळावा जिल्हयात उत्साहात साजरा











भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व
डिजी धन मेळावा जिल्हयात उत्साहात साजरा
         अलिबाग दि.14 (जिमाका), महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त त्यांना रायगड जिल्हयात सर्वत्र अभिवादन करण्यात आले. तसेच या जयंतीच्या औचित्याने निती आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हात सर्वत्र डिजी धन मेळावा व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्हयातील 15 तालुक्यात व अन्य महत्वाच्या गावांमध्ये ही वेगवेगळया उपक्रमांनी हा ज्ञानदिन दिन साजरा करण्यात आला.
जिल्ह्यातील विविध उपक्रम
            पेण महसूल विभाग :- पेण महसूल विभागात आमदार र्धेयर्शिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित, पेण उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुलदवाड, पेण तहसिलदार अजय पाटणे, पाली उपविभागीय अधिकारी नितील सदगीर, सुधागड पाली तहसिलदार व्ही.एन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कामार्ली येथे आमदार र्धेयशिल पाटील यांच्या हस्ते डिजीधन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. रोखरहीत व्यवहार करतांना त्याचा सर्व जनतेला फायदा होईल अशा प्रकारे शासनाने अंमलबजावणी करावी. तसेच या सुविधेमुळे जनतेची अडचण होऊ नये अशी बँकांनी काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले. डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कु.भावेश शामकांत घरत, प्रथम क्रमांक, कु.बबुलेश राम यादव, द्वितीय क्रमांक व कु.रुपम सुभाष पाटील यांना तृत्तीय क्रमांक प्राप्त झाला असून सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदारांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 
तसेच 1.) स्टेट बँक ऑफ इंडिया पेण शाखा 2.) जिते येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 3. )वडखळ येथे युनियन बँक 4.) बेणसे येथे बँक ऑफ इंडिया 5.) समाज मंदिर कामर्ली येथे डिजीधन मेळाव्यात  बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे, मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक करणे, डिजिटल व्यवहार इ. बाबत नोंदणी व जनजागृती करण्यात आली.
तहसिलदार पेण यांनी प्रास्ताविकात सर्व जनतेने रोखरहीत आर्थिक व्यवहाराच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे असे सांगितले. या कार्यक्रमास जयप्रकाश ठाकूर, श्रीमती दळवी सरपंच कामार्ली तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, बँक ऑफ इंडिया कामार्ली शाखेचे मॅनेजर, निवासी नायब तहसिलदार पेण, तहसिल कार्यालयातील, लिपिक, मंडळ अधिकारी कामार्ली, सर्व तलाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश दळवी यांनी विशेष प्रयत्न केले.
तर सुधागड तालुक्यामध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन परळी, पेडली, पाली, नांदगांव या ठिकाणी डिजी धन मेळावा, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती श्रीमती दिघे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपसभापती श्रीमती देसाई, सुधागड तहसिलदार व्ही.एन.निंबाळकर, रा.जि.म.बँक लि.शाखा पाली चे व्यवस्थापक व्यापारी असोशिएशन, ग्रामस्थ उपस्थित होते.


पनवेल महसूल विभाग :- उपविभागीय अधिकारी पनवेल भरत शितोळे, तहसिलदार पनवेल दिपक आकडे, तहसिलदार उरण श्रीमती कल्पना गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजी धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा.पंतप्रधान महोदयांचे कॅशलेस संदर्भात लाईव्ह भाषण शिवाजी चौक व खांदा कॉलनी येथे थेट प्रसारण करण्यात आले.
यावेळी  पनवेल तालुक्यात डिजीटल फायनान्स ड्राईव्ह अंतर्गत विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. नेरे, क्रोप्रोली, चिपळे, वाकडी, शिरढोण, गव्हाण या गावांमध्ये बँक ऑफ इंडिया व विजया बँकेच्या सहकार्यांनी कॅशलेस व्यवहारा संदर्भात मार्गदर्शन केले. कॅशलेस संदर्भात सिकेटी हायस्कूल व महाविद्यालय व डोंबाला कॉलेज येथे निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
तर उरण तालुक्यात डिजी धन मेळावा, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
            महाड महसूल विभाग :- महाड महसूल विभागात उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते, महाड तहसलिदार औदुंबर पाटील,  यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तहसिल कार्यालयात डिजी धन मेळावा, रांगोळी स्पर्धा तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रोहा महसूल विभाग :- रोहा महसूल विभागात उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले, रोहा तहसिलदार सुरेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली  डिजी धन मेळावा, विविध स्पर्धा,  व्यापारांना पॉस मशिनचे वाटप करण्यात आले.
अलिबाग महसूल विभाग :- अलिबाग महसूल विभागात उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनावणे, अलिबाग तहसिलदार प्रकाश सकपाळ, मुरुड उपविभागीय अधिकारी अमरसिंग भोसले, मुरुड तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजी धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिघी ग्रामपंचायत अलिबाग येथे  डिजीधन मेळाव्याचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविण्यात आले.
 मुरुड तहसिल कार्यालयात डिजी धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर एस.ए. हायस्कूल येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कर्जत महसूल विभाग :- कर्जत महसूल विभागात उपविभागीय अधिकारी दत्ता भडकवाड, कर्जत तहसिलदार अविनाश कोष्टी,  खालापूर उपविभागीय अधिकारी श्रीमती शीतल देशमुख, खालापूर तहसिलदार राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चौक हायस्कूल खालापूर येथे जि.प.समिती सभापती, पंचायत समिती सदस्य व सरंपच यांच्या उपस्थित डिजी धन मेळाव्याचे व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
श्रीवर्धन महसूल विभाग :- श्रीवर्धन महसूल विभागात उपविभागीय अधिकारी नविन पवार, तहसिलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजी धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
म्हसळा तहसिलदार विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात शाळा, बँक व तहसिल कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व डिजी धन मेळावे, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
माणगांव महसूल विभाग :- माणगांव महसूल विभागात उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिरके, तहसिलदार श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिजी धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
तर तळा तहसिलदार डी.बी.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालयात डिजी धन मेळावे, विविध स्पर्धांचे आयोजन करुन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

0000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक