जागतिक गुंतवणूकदारासांठी महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक गुंतवणूकदारासांठी महाराष्ट्र
सर्वाधिक पसंतीचे राज्य
                                  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
            अलिबाग दि.28 (जिमाका), जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य असून देशात झालेल्या गुंतवणूकीपैकी अर्धी गुंतवणूक राज्यात झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाताळगंगा येथे केले.
            रसायनी पाताळगंगा येथे जपानच्या कोकुयो व भारताच्या कॅम्लीन यांच्या संयुक्त नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जपानचे राजदूत केंग हिरामटसु, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले,  कॅम्लीनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर, उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नबूचिका डोई, उपाध्यक्ष कॅम्लीन यासूनरो कूरोडा, वरिष्ठ उपाध्यक्ष ताकूयो मोरीकावा आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, मेक ईन महाराष्ट्र ईज ऑफ डुईंग बिजनेस यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास अधिक गुंतवणूकदार उत्सुक आहेत. भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या देशातील तरुण हातांना रोजगार उपलब्ध करुन दिल्यास ते देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीत आपला सहयोग देऊ शकतील. देशात राज्यात येणार्‍या  नव्या प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध होत आहेत. 
आज जपान व भारत या दोन्ही देशांतील नामवंत कंपनीने कोकूयो कॅम्लिन नावाने  महाराष्ट्रात सर्वात मोठी अशी कंपनी सुरु केली आहे. या संयुक्त प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. जपान या देशाने आपल्या उत्पादनात एक विश्वासाहर्ता निर्माण केली असल्याने, मेड ईन जपान उत्पादनाला बाजारात पसंती आहे. त्याचाही लाभ होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जपानाच्या या विश्वासहर्तमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये  म्हणजे  मेट्रो 3, ट्रान्स हार्बर लिंक या सारख्या प्रकल्पात जपान हा सहयोगी देश आहे.  याचा आम्हाला आनंद होतो. 
कॅम्लिनने  1931 साली गिरगावात छोट्याशा शाई उद्योगाच्या रुपाने लावलेल्या छोट्याच्या रोपट्याचे रुपांतर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकोद्योगात झाल्याचे पाहून आनंद वाटला. मराठी माणसाने मोठ्या विश्‍वासाने हा उभारलेला उद्योग आहे.  आपण लहानपणापासून कॅम्लिनच्या सहवासात शिकलेलो आहोत याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.  तसेच येत्या सहा महिन्यात या कंपनीच्या आणखी विस्तार होवो असे म्हणत या संयुक्त प्रकल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
जपानचे राजदूत केंग हिरामटसू
जपानचे राजदूत केंग हिरामटसू यांनी याप्रसंगी बोलताना आजचा हा प्रकल्प भारत आणि जपान या दोन देशासाठी अभिमानाचा असल्याचे सांगून यामुळे दोन्ही देशातीले मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृध्दींगत होत आहेत असे म्हटले. कोकोयोचा हा आंतरराषाट्रीय स्तरावरील सर्वात मोठा प्रकल्प असल्याची माहिती देवून त्यांनी या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.मेड इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र  या दोन्हीही महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या गुणवत्तेनुसार येथील उत्पादन होईल असा विश्‍वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 
तसेच अध्यक्ष्‍ा दिलीप दांडेकर यांनी  आपल्या भाषणातून कंपनीच्या कार्यपध्दतीची थोडक्यात ओळख करुन दिली. तर प्रास्ताविकातून श्रीराम दांडेकर यांनी प्रकल्पा विषयक सविस्तर माहिती दिली. तसेच हा प्रकल्प  प्रदुषण विरहित असून रोजगार निर्मितीसाठी महत्वाचा असल्याचे सांगितले.
या प्रसंगी प्रकल्प उभारणीत सहभागी असलेल्या  प्रमुखांचा प्रातिनिधीक सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास उद्योग विश्‍वातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

0000000










Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक