महाराष्ट्र दिन समारंभ रायगड जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबध्द -पालकमंत्री प्रकाश महेता

  महाराष्ट्र दिन  समारंभ
  रायगड जिल्हयाच्या सर्वांगिण  
  विकासासाठी सदैव कटिबध्द
                                                -पालकमंत्री प्रकाश महेता


          अलिबाग दि.1 (जिमाका)  रायगड जिल्हयाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असून सर्वांच्या साथीने रायगड जिल्हा राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश महेता यांनी महाराष्ट्र दिन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतांना केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवार, दि.01 मे 2017 रोजी  त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रध्वज वंदन समारंभ  अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.
या समारंभासाठी   रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. अदिती सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रसाद पाटील  तसेच ज्येष्ठ नागरिक ,अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देतांना पालकमंत्र्यांनी रायगड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध कामगिरीचा उल्लेख करुन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.यात जिल्हाधिकारी कार्यालयास मिळालेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धेतील राज्यस्तरीय पारितोषिक तसेच उद्दिष्टपूर्ती ,जिल्हा विकास निधी नियोजन, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, आदिवासी दळी  जमीन प्रश्न सोडवणूक,  2 कोटी वृक्ष लागवड आदींचा समावेश आहे. तसेच रायगड किल्ला संवर्धन बाबतही पालकमंत्र्यांनी विशेष उल्लेख करुन राज्य शासन करीत असलेल्या कामांची माहिती दिली. पद्मश्री सन्मानाबद्दल स्वच्छता दुत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील नुतन पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.


मानवंदना
 यानंतर पालकमंत्री महोदयांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. यात पोलीस दलाचे पुरुष व महिला प्लॅटून, होमर्गाचे पुरुष व महिला प्लॅटून, दामिनी पथक, बीट मार्शल पथक,  नगरपालिका अग्नीशामक दल, बॉब शोध व  नाशक पथक, शीघ्र कृती दल, पोलीस बँन्ड पथक यांनी मानवंदना दिली.
                                      विशेष कामगिरीबद्दल सन्मान
तसेच विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, यांचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.महाराष्ट्र पोलीस दलात   उत्तम कामगिरी केलेले पोलीस निरीक्षक विक्रम सदाशिव जगताप,   पोलीस उप निरिक्षक, प्रभाकर जानू खोत, , सहाय्यक फौजदार, मदन पुरुषोत्तम खरे,   पोलीस हवालदार पी.एस.खेडेकर,   अशोक भुसाणे , हेमंत पाटील  , प्रमोद मानकर  ,  विश्वास गंभीर , मुन्ना रमजान पटेल, नवनाथ शिवराम पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह तसेच नक्षलग्रस्त विभागात दोन वर्ष समाधानकारकपणे कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर कावळे व सुहास सुरेश आव्हाड यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. वैभव वामन आंब्रे सजा शिरवली ता.माणगाव येथील तलाठी यांना 2016-17 चा आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला.
स्मार्ट ग्राम पारितोषिक
पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर स्मार्ट ग्राम योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या 15 ग्रामपंचायतींचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यात रोहा तालुका धाटाव ग्रामपंचायत,  पनवेल तालुका सावळे ग्रामपंचायत, माणगांव तालुका चांदोरे ग्रामपंचायत, पेण तालुका सावरसई ग्रामपंचायत, अलिबाग  तालुका आंबेपूर ग्रामपंचायत, उरण तालुका जासई ग्रामपंचायत, म्हसळा तालुका फळसप ग्रामपंचायत, महाड तालुका वरंडाली ग्रामपंचायत, खालापूर तालुका नारंगी ग्रामपंचायत, श्रीवर्धन तालुका दिवेआगर ग्रामपंचायत, पोलादपूर तालुका माटवण  ग्रामपंचायत, तळा तालुका पडवण ग्रामपंचायत, मुरुड तालुका मिठेखार ग्रामपंचायत, कर्जत तालुका हुमगांव ग्रामपंचायत, सुधागड तालुका जांभुळपाडा ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.
            उत्कृष्ट लघु उद्योजकांसाठी विजय भालचंद्र पालकर,महाड यांना प्रथम तर श्रीमती सुवर्णा रणजित पुराणिक यांना व्दितीय पुरस्काराने सन्मानित केले. होमगार्ड क्रीडा स्पर्धेत कबड्डी व कुस्ती क्रीडा प्रकारातील प्रथम व्दितीय विजेत्या खेळाडमंचाही मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यात कबड्डी योगेश पाटील, सुरेश म्हात्रे, प्रदिप पाटील, सिध्दार्थ पाटील, विवेक ठाकूर, यश अगिने, प्रज्योत सावंत , सोतनाथ पानसरे, तर कुस्ती- प्रतिक पाटील, जयेंद्र भोमकर यांचा समावेश आहे.
या वेळी विविध पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक,नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                                       00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक