पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक
 मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे
-    राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया

अलिबाग दि .19 - (जि.मा.का) पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र मतदारांनी मनात संभ्रम ठेवता, मुक्त वातावरणात निर्भयतेने मतदान करावे लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज पनवेल येथे केले. दि.24 मे रोजी होणार्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना  ते बोलत  होते.
      यावेळी राज्य  निवडणूक आयोगाचे सचिव, शेखर चन्ने, पोलीस आयुक्त नवी मुंबई, हेमंत नगराळे, महानगर पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, निवडणूक निरीक्षक मकरंद देशमुख श्रीमती अनिता वानखेडे ,उपायुक्त मंगेश चितळे तसेच सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
     पुढे मार्गदर्शन करताना आयुक्त म्हणाले कि, महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे तसेच मतदारांना मतदान केंद्रात योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधितांनी लक्ष द्यावे. पनवेल सारख्या  महानगरपालिकेत मतदान केंद्र ही 100 टक्के  आदर्श असली पाहिजेत. त्या दृष्टीने सर्वानी तयारी करावी. दिव्यांग ,वयस्कर मतदारांसाठी असलेली व्यवस्था महत्वाची असून ती चोख ठेवावी. दिव्यांगांचे वाहन मतदान केंद्राच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ देण्यात यावे ज्या योगे त्यांना अधिक सुविधा होऊ शकेल. तसेच आवश्यक त्या ठिकाणी रुग्णवाहिका, व्हिलचेअर  याचीही सुविधा करुन मतदारांना त्याची माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले.
          मतदार जनजागृती आचारसंहिता
          मतदार जनजागृतीसाठी करावयाच्या सर्व उपक्रमांचे आयोजन होणे आवश्यक आहे. तसेच विविध सोसायट्यांमध्येही याबाबत जागृतता करावी. सार्वजनिक रस्त्यांवर मतदान जागृती बाबत होल्डींग पोस्टर लाऊन मतदारांना माहिती द्यावी. मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी (व्होटर स्लिप) पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यरत करावी अशा सुचना त्यांनी दिल्या. आचारसंहितेच्या पालनाबाबतही काटेकोरपणे यंत्रणेने काम करावे असे त्यांनी सांगितले. आलेल्या प्रत्येक सुचना, तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी अशा सुचना त्यांनी दिल्याराज्य उत्पादन शुल्क अधिक्षक, परिवहन विभाग, आयकर विभाग, विक्रीकर विभाग, सहकारी संस्था, बँक व्यवहार आदिबाबतही संंबधितांकडून होत असलेल्या कार्यवाहिची माहिती आयुक्तांनी घेतली मार्गदर्शन केले.
          राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनीही पेडन्युज, भरारी पथक, खर्चाचा हिशोब, आचारसंहिता पालन याबाबत स्पष्ट सुचना देऊन मार्गदर्शन केले.
          बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करुन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणातून दिली. तसेच पोलीस उपआयुक्त राजेंद्र माने यांनीही पोलीस विभागामार्फत होत असलेल्या कार्यवाहिची सविस्तर माहिती दिली.
          या बैठकीस पोलीस उपआयुक्त वाहतुक नितीन पवारडीसीपी (एस.बी.) राजेश बनसोडे, सा.बां.मुख्य अभियंता बनगीनवार, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक निलेश सांगडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगीनी पाटील, तहसिलदार दिपक आकडेजिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चेतन चौधरी, लिड बँक मॅनेजर अशोक नंदनवार तसेच पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संबंधातील सर्व विभागीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेवटी उपायुक्त मंगेश चितळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.





Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक