अवयवदान जनजागृती अभियानात सहभागी व्हा - जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आवाहन


अलिबाग दि.24 :-  अवयवदान हे  जीवन देणारे महादान आहे.  त्यामुळे  राज्यात सर्वत्र 29 व 30 ऑगस्ट या दोन दिवस होणाऱ्या महा अभियानात सर्वांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. या अवयवदान संदर्भात जनजागृती करुन या महाअभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान जनजागृती संदर्भात बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
              यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीधर बोधे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एस.एन.बडे, अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी  व अन्य अधिकारी  उपस्थित होते.
         यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  रायगड जिल्यातील सर्व संघटना, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महसुल विभाग तसेच शासकीय व निमशासकीय कार्यलये व  सरपंचामार्फत जनतेत जनजागृती करुन अवयवदान करण्याबाबतचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरुन   आपण आपला अवयवदानाचा महत्वपूर्ण  संकल्प करावा.  या काळात शासनाच्यावतीने अवयवदानाबाबतचे अर्ज जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध करण्यात येणार आहेत. अवयवदानाच्या संकल्पनेचा आदर करुन त्यांच्या पश्चात अवयवदानासाठी  पुढे यावे.  या अभियान काळात जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन फॉर्म भरुन घेतील त्यांचा मा. पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव केला जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी शेवटी  सांगितले.
            प्रथम जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी अवयवदान संदर्भात सर्वांना शपथ दिली. डॉ. सुहास कोरे यांनी सादरीकरणाद्वारे अवयवदाना बाबतची माहिती उपस्थितांना दिली. तर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी पथनाटय सादर केले.
                                                      0000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक