ग्राहकांच्या सुविधेला प्राधान्य द्या- ना. चंद्रशेखर बावनकुळे





अलिबाग,(जिमाका)दि.23:- राज्याचे वीज उत्पादन हे अतिरिक्त होत आहे. ग्राहकांना २४x७वीज पुरवठा करण्यास सर्वोच्च प्राथमिकता आहे.अशा परिस्थितीत ग्राहकांना राज्य वीज वितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा संबंधीत सेवा या विनाव्यत्यय उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे निर्देश राज्याचे ऊर्जा, नवीन नवीकरण ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
पनवेल येथे ना.बावनकुळे यांनी आज वीज ग्राहकांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी जनता दरबार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ना.बावनकुळे यांच्या हस्ते पनवेल उरण तालुक्यातील पायाभूत  आराखडा 2 अंतर्गत उभारलेल्या 33 के.व्ही. उपकेंद्राचे तसेच दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत पुषपक नोड, वहाळ उभारण्यात येणाऱ्या  33 के. व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजनही ना.बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी खा. श्रीरंग वारणे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, . प्रशांत ठाकूर, . सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, पनवेल पंचायत समिती सभापति कविता पाटील, उरण नगरपरिषद अध्यक्ष सौ. सायली म्हात्रे.
 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक अभिजित देशपांडे, संचालक प्रकल्प  दिनेश साबू,  कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे, कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता रामराव मुंढे,  भांडुप(ना.) परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, वाशी मंडळाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर, पेण मंडळाचे अधिक्षक अभियंता फारुख शेख, भांडुप (ना.) परिमंडळाचे अधिक्षक अभियंता राहुल बोरीकर आदी लोकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पनवेल शहर, ग्रामीण तसेच उरण तालुक्यातील ग्राहक उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका हद्दीतील तसेच औद्योगिक वसाहतीतील वीज पुरवठ्याशी संबंधीत समस्या नागरिकांनी मांडल्या.त्यात जादा वीजबिल आकारणी, अनियमित वीज पुरवठा, अनियमित लोडशेडिंग, स्थानिक वीज जोडणीशी संबंधित विविध समस्या ना.बावनकुळे यांच्या समोर सादर केल्या.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक