ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात 16 रोजी सुटी


अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.13- जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी पार पडणार आहेत.
            त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, यांनी निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सोमवार, दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार,अधिकारी,कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त  निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत मतदार असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
सदर सुट्टी उद्योग,उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने,दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना  पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य् नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र याबाबत त्यांनी संबंधित  महानगरपालिक आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची  पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल यांची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य् ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांचेविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी निवडणूक आदेशान्वये  कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड