राज्य महिला आयोगाची गुरुवारी ठाणे येथे जनसुनावणी


अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.10- महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2017 रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर ,नवी मुंबईतील महिलांच्या  तक्रारींचे निवारण करणार आहे.यावेळी अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न् करत आहे. महिलांना न्याय मिळावा.यासाठी महिला आयेाग आपल्या दारी हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभागस्तरावर महिलांच्या  तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रारी करणे,सुनावणीसाठी उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसंच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमांचा फायदा होणार आहे. 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारी दाखल करुन त्याच ठिकाणी त्यावर कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरीत दिलास देण्याचं काम आयोग याद्वारे करत आहे.
दि.12 रोजी या संकल्पनेअंतर्गत आयोग ठाणे,रायगड,पालघर तसेच नवी मुंबईतील नव्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार नगर,हिरानंदानी मेडोंस,पोखरण रोड क्र.2,ठाणे (प) येथे दुपारी एक वाजता नव्या तक्रारींवर कार्यवाही होणार आहे. अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन या कार्यशाळेत आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्षा विजया रहाटकर,केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड