लेखा परीक्षण शुल्क 31 पर्यंत अदा करण्याच्या सुचना


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:-वैधानिक लेखापरिक्षण अंती शासनाकडे भरणा केलेले 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क संबंधित सनदि, प्रमाणित लेखापरिक्षकांना दि.31 जानेवारी पर्यंत अदा करणेबाबत सुचित केलेले आहे. तरी ठाणे,पालघर व रायगड जिल्ह्यातील संबंधीत सनदी,प्रमाणित लेखापरिक्षक यांनी सहकारी पशु,दुग्ध व मत्स्य संघ संस्थांचे 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क शासनाकडे भरणा केलेल्या चलनांच्या प्रती व संस्थांची यादी तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन गणेश एस. शिंदे,जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकरी संस्था पदुम,ठाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक