लोकशाही पंधरवड्यास आजपासून प्रारंभ


         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकशाही, निवडणूका व सुशासन यासंदर्भात लोकशिक्षण व्हावे यासाठी शुक्रवार दि.26 पासून 10 फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या जनजागृतीपर उपक्रमात लोकशाहीचे संवर्धन, संरक्षण आणि बळकटीकरण करण्यासंदर्भात  जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांत स्थानिक स्वराज्य संस्थांचे व त्यांच्या निवडणूकांचे महत्त्व  याबाबत अधिकारी पदाधिकारी यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल. तसेच उद्योगांनीही  आपले अधिकारी व कामगार, कर्मचाऱ्यांसाठी  विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. वरील उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित करावे. स्थानिक नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक