प्रजासत्ताक दिनः मुख्य शासकीय समारंभ आज पोलीस कवायत मैदानावर


अलिबाग,जि.रायगड(जिमाका)दि.25- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर शुक्रवार दि.26 रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ना. महेता यांच्या हस्ते ठिक सकाळी सव्वा नऊ वा. राष्ट्रध्वज वंदन होईल. त्यानंतर संचलन होईल. तरी या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक , लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी- कर्मचारी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक