मराठा बटालियनचा स्थापना दिवस माजी सैनिकांना सहभागाचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23-  सैन्याच्या 2 मराठा लाईट इंन्फंट्री (काली पाँचवी) बटालियनचा 250 वा स्थापना दिवस 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील जे माजी सैनिक 2 मराठा लाईट इंन्फंट्री (काली पाँचवी) चे सदस्य आहेत व ते सदर स्थापना दिवसात सहभागी होण्यास इच्छुक आहेत, त्यांनी या कार्यक्रमास सहभागी व्हावे असे अवाहन मेजर प्रांजल प्र.जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. वरील कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8007869802 व 7066046204 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक