उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण अंतर्गत वाहनचाचण्यांसाठी मौजे जिते येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक कार्यान्वित


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- मे.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्यावसायिक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांकरीता गट नं.28/1 मौजे जिते,ता.पेण जि.रायगड येथील शासकीय जागेतील भूखंडावरील 250 मी ब्रेक टेस्ट ट्रॅक कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण जि. रायगड यांनी दिली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण जि.रायगड कार्यालयांतर्गत असलेल्या पेण, अलिबाग,मुरुड,महाड, पेालादपूर , तळा, श्रीवर्धन,म्हसळा,रोहा,मागणांव,सुधागड-पाली तालुक्यातील सर्व वाहनधारकांसाठी  व्यावसायिक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज गट नं.28/1 मौजे जिते,ता.पेण जि.रायगड येथील शासकीय जागेतील भूखंडावरील 250 मी ब्रेक टेस्ट् ट्रॅकवर सुरु करण्यात आले आहे,याची सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी केले आहे.
            परिवहन संवर्गातील वाहन धारकांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी प्रथम उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे वाहन 4.0 प्रणालीवर वाहनाची नोंद करुन घेऊन (बॅकलॉग एंट्री)योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे शासकीय शुल्क् वाहन 4.0 प्रणालीवर भरावे व त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण्यासाठी अपॉईंटमेंट असलेल्या वाहनांचाच विचार केला जाईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक