स्थानिक बाजारपेठेसाठी 'अलिबाग महोत्सव' महत्वाचा-ना.गिरीश बापट


         अलिबाग,जि.रायगड(जिमाका)दि.25-  अलिबाग हे एक आगळवेगळे शहर असून या शहराला सांस्कृतिक, सामाजिक,  ऐतिहासिक वारसा लाभला आहे.  या शहरात लायन्स क्लबने आयोजित केलेला महोत्सव स्थानिक व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, तसेच सामाजिक एकोप्यासाठी महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी व पुरवठा मंत्री गिरीश बापट  यांनी  येथे केले.
            येथील पीएनपी नाट्यसभागृहाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या लायन्स क्लबच्या महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
            याप्रसंगी माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, आमदार जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.आस्वाद पाटील, अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, फेस्टीवल कमिटीचे चेअरमन संजय पाटील, चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा नाईक, तहसिलदार प्रकाश सकपाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
           ते म्हणाले की, लायन्य क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था असून ती जिल्ह्यात अनेक नाविण्यपूर्ण सेवाभावी उपक्रम राबवित आहे.  लायन्य क्लब हेल्थ फाऊंउेशनच्या माध्यमातून डोळ्यांची शस्त्रक्रिया करुन हजारो लोकांना दृष्टी देण्याचे काम करीत आहे.  समाजात जनजागृती निर्माण करणारी ही एक सेवाभावी संस्था आहे.  शहरातील स्वच्छता, आरोग्याला पोषण वातावरणामुळे या ठिकाणी पर्यटक जास्त प्रमाणात येत असतात.  त्यामुळे येथील पर्यटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे.  येथील लहान-मोठ्या उत्पादकांना बाजारपेठ देण्याचे काम या संस्थेने फेस्टिवलच्या माध्यमातून केले आहे. या संस्थेने शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातही उपक्रम राबवून तळागाळातील घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाच्या प्रारंभी शिव मर्दानी आखाडा साळाव येथील मुलांनी मल्लखाबांचे प्रात्यक्षिक करुन दाखवून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमास अलिबाग शहरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक