राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23:-  भारत निवडणूक आयोजन व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशाप्रमाणे दरवर्षी दि.25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हास्तरावर, विभागस्तरावर, तालुकास्तरावर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने यावर्षी भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणूका (Accessible Elections) हा विषय घोषित केला आहे.
            जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल अलिबाग येथे जिल्हास्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी सकाळी 9 वाजता जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल अलिबाग-महावीर चौक-बालाजी नाका-मारुती मंदिर-अरुणकुमार वैद्य हायस्कूल या मार्गे शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच पथनाट्य आयोजीत करण्यात आले आहे. अपंग घटकांना निवडणूक प्रक्रीयेमध्ये भाग घेणे सुलभ व्हावे हा हेतू साध्य होण्यासाठी अपंग मतदारांना या दिवशी सन्मानीत करण्यात येणार आहे. सहस्त्र मतदार ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2000 रोजी झालेला आहे अशा मतदारांना ओळखपत्र व बॅच देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व कॉलेज यामध्ये निवडणूक साक्षरता क्लब व दुर्गम क्षेत्रामध्ये जेथे शाळा व कॉलेज नाही अशा ठिकाणी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत चुनाव पाठशाळा स्थापन करण्यात येणार आहे. निवडणूक व मतदान विषयावर आधारीत चित्रकला, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच चित्रकला व रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. मतदार यादी संदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. निवडणूक विषयक उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडणूक लेखनिक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक