जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22.45 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.45 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.
1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2750.70
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त
दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 9.00 मि.मि.,
पेण-27.00 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-21.20 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-12.00
मि.मि., खालापूर-17.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-21.00 मि.मि., सुधागड-25.00
मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-34.00 मि.मि., पोलादपूर-42.00, म्हसळा-23.00मि.मि.,
श्रीवर्धन-19.00 मि.मि., माथेरान-35.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 359.20 मि.मि.इतके
आहे. त्याची सरासरी 22.45 मि. मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 87.53 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment