बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत 5700 विद्यार्थ्यांचा सहभाग



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9-  बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी  चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत जिल्ह्यातील 321 शाळांमधून 5700 विद्यार्थि सहभागी झाले व त्यातील 124 विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे ही पारितोषिक प्राप्त ठरली आहेत. लवकरच या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.
 यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार,  जिल्ह्यातील 321 शाळांमध्ये दि.23 ते 25 जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली.  सहभागी स्पर्धकांमधील इयत्ता 5 वी ते 7 वी गटातील उत्कृष्ट तीन चित्र व उत्तेजनार्थ दोन चित्र, तर इयत्ता 8वी ते 10 वी गटातील उत्कृष्ट तीन व उत्तेजनार्थ दोन चित्र परितोषिक प्राप्त म्हणून निवडण्यात आले. अशा एकूण 124 विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित  करण्यात येणार आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक