भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन सोहळा: पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10-  भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त बुधवार दि.15 रोजी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणी ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभाचे ध्वजारोहण व ध्वजवंदन होईल. बुधवार दि.15 रोजी सकाळी 9 वा. 5 मि. नी पोलीस कवायत मैदान, अलिबाग येथे हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक