बालकल्याण संस्था तपासणी समिती अशासकीय सदस्य नेमणूक; इच्छूकांकडून प्रस्ताव मागविले



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10-  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार अधिनियमांतर्गत नोंदणीकृत तसेच मान्यताप्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात येणार आहे.
या समितीमध्ये खालील अशासकीय सदस्याकडून नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
1) बाल हक्क, संगोपन,संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा एक सदस्य.2)बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ज्ञ.
तसेच अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी ती व्यक्ती किमान पदवीधर असली पाहिजे. तसेच बाल हक्क्, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच त्या व्यक्तीचे  वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. तसेच अशासकीय सदस्यांचा  कार्यकाळ नेमणूकीपासून 3 वर्षाचा असेल.
तरी इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,श्रीबाग  नं.2,डॉ. वाजे हॉस्पीटल जवळ, अलिबाग, जि. रायगड. दूरध्वनी क्र.02141-225321 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक