पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका)-:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण हे बुधवार दि. 21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
      बुधवार दि.21 रोजी सकाळी नऊ वा. पाली ता. सुधागड येथे आगमन व बल्लाळेश्वर नाविन्यपूर्ण सहकारी सेवा संस्थेच्या हमीभाव भात खरेदी केंद्राचे उदघाटन. सकाळी दहा वा. पाली येथून ता.तळा जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी अकरा वा. ता.तळा, जि.रायगड येथे आगमन व महालक्ष्मी नाविन्यपूर्ण सहकारी सेवा संस्थेच्या हमीभाव भात खरेदी केंद्राचे उदघाटन.दुपारी बारा वा. ता.तळा येथून ता. रोहा जि. रायगडकडे प्रयाण.दुपारी साडेबारा वा. मौजे रोठ ता.रोहा जि. रायगड येथे आगमन व श्रीपर्ण नाविन्यपूर्ण सहकारी सेवा संस्थेच्या हमीभाव भात खरेदी केंद्राचे उदघाटन.दुपारी सव्वा एक वा. मौजे रोठ ता. रोहा येथे अमित घाग यांचे निवासस्थानी भेट.दुपारी दोन वा. मौजे धोंडखार ता. रोहा जि.रायगडकडे प्रयाण. दु.पावणे तीन वा. मौजे धोंडखार, ता. रोहा जि. रायगड येथे आगमन व लक्ष्मी नाविन्यपूर्ण सहकारी सेवा संस्थेच्या हमीभाव भात खरेदी केंद्राचे उदघाटन. दुपारी तीन वाजता मौजे वडखळ जि. रायगडकडे प्रयाण. दुपारी चार वाजता शासकीय धान्य गोदाम, वडखळ येथे आगमन व काळभैरव सदगुरुकृपा नाविन्यपूर्ण सहकारी सेवा संस्थेच्या हमीभाव भात खरेदी केंद्राचे उदघाटन. सायंकाळी पाच वाजता वडखळ येथून  पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक