महाड,अति. महाड, विळे भागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त भूखंड मागणीसाठी नवीन अर्ज मागविले



अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका)-:- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत महाड औद्योगिक क्षेत्र, अति.महाड औद्योगिक क्षेत्र,  विळे भागाडता. माणगाव औद्योगिक क्षेत्र येथे महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्त सदराखाली 100 चौ. मी.चे भूखंड मागणीसाठी दि.31 मे 2015 पर्यंत मागणी अर्ज करणे आवश्यक होते.  तथापि काही औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त खातेदारांनी दि.31 मे 2015 पूर्वी अर्ज सादर न केल्यामुळे महामंडळाच्या भूखंड वाटपाच्या धोरणापासून ते वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा  इच्छूक भूपिडीतांकडून किंवा त्यांच्या वारसांकडून नवीन मागणी अर्ज दि.4 मे 2019 पर्यंत प्रादेशिक अधिकारी, प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खांदा कॉलनीच्या समोर, फ्लाय ओव्हर ब्रिजजवळ, नवीन पनवेल, जि.रायगड-410206 (दूरध्वनी क्र.022-27483647) या  पत्यावर स्विकारण्यात येणार आहेत.  त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची खातेदारांनी नोंद घ्यावी, असे क्षेत्र व्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पनवेल यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक