हॉटेल कपलचा परमिट रुम परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित


अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका)-भिंगारी, काळुंद्रे ता. पनवेल जि. रायगड येथील हॉटेल कपल येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईच्या आधारे जिल्हाधिकारी रायगड यांनी हॉटेल कपलचा परमिट रुम परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्याचे आदेश  दिले आहेत, अशी माहिती  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक एस.बी. झावरे यांनी दिली आहे.
या संदर्भात, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड- अलिबाग यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जयराम कोरगा शेट्टी प्रो.मे.हॉटेल कपल, एफएल-3 अनुक्र.181, भिगारी काळुंद्रे ता.पनवेल या आस्थापनेस निरीक्षक, राज्य उत्पादनन शुल्क, यांनी दि.11 ऑगस्ट 2018 आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, पनवेल यांनी दि. 29ऑगस्ट 2018 रोजी भेट देऊन तपासणी केली असता आढळून आलेल्या विसंगती तसेच पोलीस विभागाने सदर आस्थापनेवर नोदविलेला गुन्हा व बाबी विचारात घेऊन सदर हॉटेल आस्थापना वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असल्याने  जिल्हाधिकारी रायगड यांनी हॉटेल कपल यांचा एफएल-3 परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. तसेच हॉटेल अनासेल नाईट रायडर या परवाना कक्षात काम करणाऱ्या पाच नोकरांचे (महिला व पुरुष) नोकरनामे रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या पुढे परवानाकक्षात काम करणाऱ्या नोकरांवर पोलीस विभागाकडून कारवाई झाल्यास, नोकरनामाधारक गैरवर्तणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांचे नोकरनामे रद्द करण्यात येतील अशी माहिती  अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड एस. बी झावरे यांनी दिली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक