लोकसभा निवडणुक-2019 लेखा पुनर्मेळ अंतिम बैठक आज (दि.18)



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-  लोकसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने खर्च निरिक्षक निलंककुमार यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.18 रोजी लेखा पुनर्मेळ अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.  लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 78 अन्वये प्रत्येक उमेदवाराने निकाल जाहीर झाल्यापासून तीस (30) दिवसांच्या आत लेखे सादर करणे आवश्यक आहे.  तसेच 6 (क) व (ख) अन्वये उमेदवाराने मूळ प्रमाणकासह खर्चाची नोंदवही, देयके व प्रमाणके आधारभूत शपथपत्रे तसेच संक्षिप्त विवरणपत्रासह आवश्यक दस्तऐवजांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक