प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेशासाठी दि. 24 पर्यंत मुदतवाढ



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (D.EI.ED)  प्रथम वर्ष ऑनलाईन (शासकीय कोटा) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि.17 जून रोजी पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती.  सदर अर्ज भरण्यासाठी आता सोमवार दि.24 जून रोजी सायं. सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  याबाबतच्या सर्व सूचना,प्रवेश पात्रता इत्यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असेल.   यासाठी संबंधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावे, असे अध्यक्ष राज्यस्तरीय डी.एल.एङप्रवेश निवड,निर्णय व प्रवेश सनियंत्रण समिती तथा संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड