रेवदंडा खाडी पुलावरील अति अवजड वाहनांची वाहतूक आता रोहा चणेरा मार्गे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-  अलिबागकडून साळावकडे व साळावकडून अलिबागकडे रेवदंडा खाडी पुलावरुन होत असलेली अति अवजड वाहनांची  (Mulit Axle Veichles, Overload Two Axle Veichle) वाहतूक बंद करुन सदर वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन रोहा चणेरा मार्गे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.
            सदर आदेशान्वये अलिबागकडून साळावकडे व साळावकडून अलिबागकडे वाहनांना विहित भार वाहन क्षमतेच्या अधिन राहून (Permitted Load Carring Capacity Of  Veichle For Mulit Axle Veichles & Two Axle Veichle) रात्री 9 ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
            रेवदंडा खाडीपुल अवजड वाहतुकीसाठी सक्षम नाही.  तसेच  वाहनांच्या विहित भार वाहन क्षमतेसंदर्भातील बाबींचे पालन होत नसल्याने रेवदंडा खाडीवरील पुलास धोका संभवत असल्याचे कार्यकारी अभियंता, सा.बा.विभाग अलिबाग यांनी कळविले आहे.  त्यामुळे अलिबागकडून साळावकडे व साळावकडून अलिबागकडे होत असलेली अति अवजड वाहनांची (Mulit Axle Veichles, Overload Two Axle Veichle) वाहतूक बंद करुन सदर वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन रोहा चणेरा मार्गे करण्यात यावी, असे आदेश मा.जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी जारी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक