पनवेल येथे उद्या रोजगार मेळावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20-  उद्योग विभाग यांच्या पुढाकाराने  शनिवार दि.22 जून रोजी पिल्लई कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंग नवीन पनवेल येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.   तर मेळाव्यासाठी उद्योग व खनिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ, राज्यमंत्री अतुल सावे, खासदार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती राहणार असून  विशेष अतिथी  म्हणून सिडकोचे अध्यक्ष  आ.प्रशांत ठाकूर, आ.मनोहर भोईर  हे उपस्थित राहणार आहेत.
गरजु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक, कोकण विभाग उद्योग संचालनालय यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक