निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त---- जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-  निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून त्यामुळे  ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासही मदत होते. त्यासाठी सर्वांनी  नियमित योगासने करावीत,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन  जिल्हयात योग प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेऊन साजरा करण्यात आला.    जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा पोलीस विभाग व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यक्रम पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता.
           यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  श्रीम.वैशाली माने,उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.अंकिता मयेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब थोरात,पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच  विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सुचिता साळवी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी, अलिबाग येथील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी  आणि शिक्षक आदींनी या योगा प्रात्याक्षिकात सहभाग घेतला.
              सुमारे एक तास चाललेल्या योग प्रात्याक्षिक कार्यक्रमात पतंजली योग समितीचे दिलीप गाटे यांनी उपस्थितांना योग प्रात्यक्षिके दाखविली आणि त्याचा शारिरीक आणि मानसिक लाभ कसा होतो याचे मार्गदर्शन केले.  तर त्यांना रवि पंडित, श्रीम.उषा बाबर, श्रीम.वैशाली पवार यांनी सहकार्य केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक