आनंदाने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-  बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी  दिनांक 17 जून  ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव आनंदाने साजरा झाला.
यावेळी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्राम पंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. प्रवेश पात्र बालकांची यादी ध्वनीक्षेपकावर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले होते. शाळेचा परिसर गावकऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छ करून सडा रांगोळी व पाना फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.
            शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षक शाळेत उपस्थित होते. बालकांची प्रभातफेरी काढण्यात आली असून पुस्तक दिन साजरा करण्यात आला. एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नसल्याची व वर्षभर 100% उपस्थित राहण्यासाठी प्रतिज्ञा देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत झाले तसेच शाळेचे वातावरण उत्साहवर्धक राहण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले. तसेच पहिल्याच दिवशी खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्यक्ष वर्गाध्यापनास प्रारंभ करण्यात आला. तसेच शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शाळांना भेटी देऊन विधायक सूचना दिल्या. शाळेच्या प्रथम दिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी रा.जि.प. शाळा मानीभुते ता. अलिबाग येथे भेट दिली.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक