शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत



            अलिबाग-दि.31(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन 2018-19 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्यक्रीडा जीवन गौरपुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्यक्रीडा पुरस्कार (महिलाक्रीडामार्गदर्शक), राज्यक्रीडा साहसी पुरस्कार,  शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार (खेळाडूखेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
            या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीचा तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंस्वाक्षांकित प्रमाणपत्रांसह  तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणा-या अर्जदारांनी आपला अर्ज संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवार दि.5 फेब्रुवारी 2020 रोजी पर्यंत सादर करावे.
याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावली इ. माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेत स्थळावर शासननिर्णय दिनांक 24, जानेवारी 2020 चे अवलोकन करावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरwww.maharashtra.gov.inwww.mumbaidivsports.com यावेबसाईटवर उपलब्धआहे.
            जीवन गौरवपुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत नसून अशा जेष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्रशासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांचेकडून तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवकसेवासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, अथवा संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे  आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.
000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक